महाराष्ट्र मुंबई

“राज्यपालांचा फोन आलेला, अर्णब यांच्या नातेवाईकांना भेटू द्या सांगितलं, पण तसं भेटता येणार नाही”

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोन आला होता. पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटू द्या सांगितलं, पण तसं भेटता येणार नाही, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील सर्व जेलमध्ये कोणत्याही कैद्याच्या नातेवाईकांना जेलमध्ये जाऊन भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे अर्णव यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटता येणार नाही. पण ते फोनवर अर्णव यांच्याशी बोलू शकतात, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

जेलमध्ये फोन वापरण्याची मुभा आहे. जेल प्रशासनाकडून त्याची परवानगी घ्यावी लागते. अर्णब यांना त्यांचे नातेवाईक किंवा वकील प्रत्यक्ष भेटू शकणार नाहीत. पण फोनवर ते बोलू शकतील, असं अनिल देशमुख म्हणालेत.

अर्णव गोस्वामी प्रकरण कोर्टात सुरु आहे. त्यामुळे यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. जो निर्णय घ्यायचा आहे तो कोर्ट घेईल, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“राज्यपालांनी अर्णब गोस्वामींऐवजी नाईक कुटुंबाची काळजी करावी”

“ठाकरे सरकारविरोधात 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा”

संग्राम देशमुख माझा जावई नाही, मेधाताई काही माझ्या दुश्मन नाही- चंद्रकांत पाटील

हायकोर्टाने स्वत: दखल घेऊन अर्णब गोस्वामींच्या धक्काबुक्कीची चौकशी करावी- देवेंद्र फडणवीस

तासाभरात 1 महिन्याचा, तर दिवाळीपूर्वी 2 महिन्यांचा पगार आणि बोनस जमा करणार- अनिल परब

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या