महाराष्ट्र मुंबई

सेलिब्रिटींवर ट्विट करण्यासाठी मोदी सरकारचा दबाव?; गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई | पॉप स्टार रिहानाने करत दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. यानंतर अनेक सेलिब्रिटींनी रिहानाला प्रत्युत्तर दिलं होतं. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर आरोप केलेत.

मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. याची गंभीर दखल घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे.

काँग्रेसने सेलिब्रिटींच्या ट्विटचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर गृप्तहेर विभाग यासंबंधी चौकशी करणार असल्याची माहिती अनिल देशमुखांनी दिली आहे.

कोणीही व्यक्तिगत पातळीवर मत व्यक्त करत असेल तर त्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही. पण ट्विटची वेळ, भाषा पाहिली तर हे भाजपच्या स्क्रिप्टनुसार करण्यात आलं का? याबाबत शंका निर्माण होते, असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या-

नवऱ्यानं बायकोला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं अन् त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार

‘आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?’; ‘स्वाभिमानी’ पोराचं सचिनच्या घराबाहेर आंदोलन

‘रोज डे’ ठरला ‘लास्ट डे’, ‘या’ कारणामुळं पुणेकर तरुणीनं उचललं धक्कादायक पाऊल

‘मोदी है, मौका लिजिए’; नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

“राज्यात ऑपरेशन लोट्स झाल्यास भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या