नागपूर महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांपेक्षा जास्त चालणार- अनिल देशमुख

नागपूर | महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांपेक्षा जास्त चालणार आहे, अशा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

केंद्र सरकार ED सारख्या मोठ्या संस्थेचा गैरवापर करत आहेत. पण हे चुकीचं आहे. यामुळेच आम्ही राज्यात सीबीआयला परवानगीशिवाय प्रवेशबंदी केली. नंतर अनेक राज्यात हा निर्णय झाला, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

गडचिरोली सारख्या दुर्गम भागात मी आणि पत्नीने पोलिसांच्या परिवारासोबत दिवाळी साजरी केली. पोलिसांचं मनोबल उंचावण्यासाठी याचा मोठा फायदा झाला, असं अनिल देशमुख म्हणाले.

नागपुरात गुंडांनी भूखंड बळकावण्याचे अनेक प्रकार घडलेत. तक्रारीनंतर आम्ही नागपुरात मोठी कारवाई केली. आता राज्यभरात भूखंड बळकावणाऱ्यांवर अशाच प्रकारे कडक कारवाई करणार आहोत, असं अनिल देशमुखांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

“मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही”

शरद पवारांवर बोलणाऱ्यांची लायकी काय आहे?- उद्धव ठाकरे

हिंदुत्व सोडायला ते का धोतर आहे?; मुख्यमंत्र्याचा राज्यपालांना टोला

…म्हणून मी स्वतः ड्रायव्हिंग करतो- उद्धव ठाकरे

तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू-उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या