बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महिलांचा लैंगिक छळ आणि बलात्कार केल्यास फाशी होणार”

मुंबई | महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ठाकरे सरकारने कठोर पावले उचलली आहेत. महिलांचा लैंगिक छळ केल्यास, त्यांच्यावर बलात्कार केल्यास थेट नराधमाला थेट फाशी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आंध्रप्रदेशातील ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवा कायदा तयार करण्यात येत असून त्यात आरोपींना थेट फाशी देण्याच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेच्या दोन्ही सभागृहात दिली आहे.

आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही स्त्रियांच्या संरक्षणासाठी नवा कायदा आणण्यात येणार आहे. त्यासाठी पाच पोलिस अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या 29 फेब्रुवारीला या समितीचा अहवाल येणार असून हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये मांडण्यात येणार आहे. तसेच मुंबईत सध्या पाच हजार सीसीटीव्ही असून आणखी पाच हजार सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.

ट्रेंडिंग बातम्या- 

भाजपचे खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर??

शाळांमध्ये मराठी न शिकवल्यास होणार इतक्या लाखाचा दंड

महत्वाच्या बातम्या- 

मराठी भाषा खऱ्या अर्थाने शक्ती आणि भक्तीची- मुख्यमंत्री

खरं बोललो तर किती त्रास होतो ते आम्हालाच माहिती- इंदोरीकर महाराज

राज्यात पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा; विधेयक मंजूर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More