मुंबई | शरजील उस्मानी उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार कुठेही असला तरी त्याला शोधून अटक करू, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजपने उस्मानीला अटक करण्याची मागणी केली. यावर अनिल देशमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यात 30 जानेवारीला एल्गार परिषदेत उस्मानी याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडिओ क्लिप पोलिसांनी तपासली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, शरजील उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
गावकऱ्यांनी मोठ्या आनंदाने शिक्षकाला दिला निरोप, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती
“मोदी सरकारने हे बजेट सामान्यांसाठी नाही तर उद्योगपतींसाठी आणलं”
…तर अजित पवार बारामतीतसुद्धा फिरू शकणार नाही- निलेश राणे
मुंबईसह राज्यातील महिलांसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मोठी घोषणा!