नागपूर | 26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात ‘जेल पर्यटन’ सुरु करत आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या उपक्रमाचं उद्घाटन करणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
येरवडा कारागृहापाठोपाठ राज्यातील इतरही कारागृहांमध्ये अशाच प्रकारे पर्यटन सुरु करण्याचा विचार असल्याचं मंत्री अनिल देशमुखांनी सांगितलं आहे.
भारतात पहिल्यांदाच जेल पर्यटन हा उपक्रम सुरु केला जात आहे. विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि सामान्य नागरिकांना या उपक्रमात जेलमध्ये जाऊन ऐतिहासिक घटनांची माहिती घेता येईल. पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंगातून याची सुरुवात करत आहोत, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
शाळा, कॉलेज व शैक्षणिक अस्थापना तसंच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभागाद्वारे जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे, असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
या देशाला भारत नाही, हिंदूस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे- संभाजी भिडे
“बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये”
“राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे पात्रता नसताना राजकारणात आले आहेत”