बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भीमा-कोरेगाव प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मोठा खुलासा

मुंबई | भाजप आणि महाविकास आघाडीत भीमा कोरेगाव तपासावरून आरोप प्रत्यारोप चालू आहेत. दरम्यान भीमा-कोरेगाव आयोगास अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन आणि इतर अनुषंगिक बाबींकरिता निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

निधी वितरणाबाबत दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले गेले असल्याचंही अनिल देशमुख यांनी सागितलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

राज्य शासनाशी कोणताही संवाद न साधता हा तपास एनआयएकडे देण्यात केला. केंद्राचा हा निर्णय घटनाबाह्य आहे. आम्ही याप्रकरणी कायदेशील सल्ला घेऊन पुढील पावलं उचलू, अशी टीकाही याआधी देशमुख यांनी केली होती.

दरम्यान, भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्र सरकारकडून एनआयएकडे देण्यात आल्यापासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांनीही केंद्राच्या या निर्णयावर सडकून टीका केली.

ट्रेंडिंग बातम्या-

“काळोखात पाप करू नका, काय असेल ते उजेडात करा

आम्ही भूमिका बदलत नसतो हो… जे बोलतो ते थेट आणि ठासून बोलतो- रूपाली ठोंबरे

महत्वाच्या बातम्या-

थंडीने आंदोलनकर्त्यांपैकी एकाचाही मृत्यू का होत नाही?; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

…म्हणून मी सीएए आणि एनआरसीला समर्थन करणार नाही- पुजा भट्ट

‘या’ मराठी अभिनेत्याला शरद पवार यांची भूमिका साकारायचीये!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More