Top News पुणे महाराष्ट्र

“देवेंद्र फडणवीस दुकान बंद होऊ नये म्हणून सरकारवर टीका करत असतात”

पुणे | राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर टीका करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीसांना टोला लगावल आहे.

देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम केलं तरी टीकाच करणार आहेत. त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असल्याचा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीसांना लावला आहे. नववर्षाच्या निमित्ताने पुण्यातील येरवडा कारागृहाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त संख्या असून आपल्याला मॉडर्न कारागृह करायचं आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कारागृहाची क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला असल्याची माहिती अनिल देशमुखांनी दिली.

दरम्यान, शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे आणि धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर रितसर कारवाई होईल, असं देशमुख म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत आला त्या वेळेस पवार साहेबांनी शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला”

केरळ सरकारने कृषि कायद्यांविरोधात मंजूर केला ठराव; भाजप आमदारानेही दिला पाठिंबा

‘सामना’च्या अग्रलेखातील भाषेबाबत रश्मी वहिनींना पत्र लिहिणार- चंद्रकांत पाटी

“काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का, असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला?”

‘सरपंच पदाचा लिलाव म्हणजे…’; अण्णा हजारेंचं मोठं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या