Top News महाराष्ट्र मुंबई

“तेंडुलकर आणि लतादीदींच्या चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही, लता मंगेशकर आमचं दैवत”

Photo Credit- Sachin Tendulkar, Lata Mangeshkar fb Account | Anil Deshmukh twitter

मुंबई | दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावर भारतीय सेलिब्रिटींनी सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. यामध्ये भारतरत्न सचिन तेंडूलकर आणि लता मंगेशकर यांचाही समावेश होता. या ट्विटनंतर महाराष्ट्र सरकारने या सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी होणार असल्याचं म्हटलं होतं. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. या प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा सहभाग असण्याची शक्यता वाटल्याने मी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

लता मंगेशकर आमचं दैवत असून सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशातील जनता मानत असल्यानं त्यांच्या चौकशीचा प्रश्नच उदभवत नाही. या ट्विट प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख आणि इतर 12 इन्फ्लुएन्सरचा समावेश असल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे त्यानुसार पोलीस कार्यवाही करत असल्याचं अनिल देशमुख म्हणाले. देशमुख यांनी आधी ट्विटची चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, संतापजनक! कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतंं.

 

थोडक्यात बातम्या-

मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे?- नितेश राणे

पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

रोहित पवार-अहिल्याबाईंसंदर्भात शरद पवार असं काय बोलले?, ज्यामुळे होतेय जोरदार टीका

“…त्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवणं यात पुरुषार्थ आहे का?”

‘पडळकराचं वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती’; जयंत पाटलांचा पडळकरांना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या