अनिल देशमुख पुन्हा गृहमंत्री होणार?, ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य
नागपूर | राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) 100 कोटींच्या वसूली प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत सापडले. अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असताना देशमुखांच्या मंत्रिमंडळवापसीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.
परमबीर सिंह (Parambir Singh) भ्रष्टाचारी माणूस आहे. त्यांच्या आरोपाने काहीही सिद्ध होणार नाही. लवकरच अनिल देशमुख महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परत येतील आणि शरद पवार (Sharad Pawar) त्यांना पुन्हा गृहमंत्रीपद देतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे आक्रमक नेते व आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी व्यक्त केला आहे.
अनिल देशमुखांच्या संदर्भात भाजपने (BJP) कटकारस्थान केलं आहे आणि हे आता समोर आलं आहे. सचिन वाझे (Sachin Vaze) रोज रंग बदलतोय. परमबीर सिंह भ्रष्टाचारी माणूस आहे. त्यांच्या आरोपाने काहीही सिद्ध होणार नाही, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी देशमुखांच्या मंत्रिमंडळवापसीबद्दल वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, अमोल मिटकरी यांनी नागपूरात बोलताना अनिल देशमुखांच्या मंत्रिमंडळवापसीबद्दल हे मोठं वक्तव्य केलं. मिटकरींच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. अमोल मिटकरी यांनी त्यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान भाजपवर देखील जोरदार निशाणा साधला.
थोडक्यात बातम्या-
“राज्यात कितीही बिकट परिस्थिती आली तरीही वीज पुरवठा थांबणार नाही”
“हिंदुंच्या सणाला परवानगी देताना यांच्या हाताला लकवा मारतो का?”
Russia Ukrain War | रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचं ‘हे’ शहर उद्ध्वस्त, इतक्या लोकांचा मृत्यू
‘बहुतेक सदाभाऊंच्याच #*# आग लागली असावी’; पवारांवरील टीकेनंतर मिटकरी भडकले
भाजपसोबतच्या मैत्रीवर आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले….
Comments are closed.