बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुम्ही आधी तुरूंगातील जेवण घ्या’; अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ कायम आहे. देशमुखांची ईडी कोठडी सोमवारी संपली. ईडी कोठडी संपल्यानंतर मुंबई विशेष न्यायालयाने देशमुखांना दणका देत त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यात अनिल देशमुखांची घरचं जेवण देण्याची केलेली मागणी देखील विशेष न्यायालयाने फेटाळुन लावली आहे.

अनिल देशमुखांच्या विशेष न्यायालयातील सुनावणी दरम्यान देशमुखांनी तब्येतीचं कारण देत घरचं जेवण मिळण्याची मागणी केली होती. अनिल देशमुखांची ही विनंती फेटाळून लावत आधी तुम्ही तुरूंगातील जेवण घ्या, योग्य नाही वाटलं तर विचार करू, असं उत्तर कोर्टाने दिलं. त्यामुळे आता अनिल देशमुखांना पुढचे काही दिवस तुरूंगातील जेवण घ्यावं लागणार आहे.

अनिल देशमुख यांची घरचं जेवण मिळण्याची विनंती जरी कोर्टाने फेटाळुन लावली असली तरी तुरूंगात वेगळा बेड देण्याची देशमुखांची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. अनिल देशमुखांनी तब्येतीचं कारण देत घरचं जेवण आणि तुरूंगात वेगळ्या बेडची मागणी केली होती. अनिल देशमुखांना घरचं जेवण मिळणार नसलं तरी त्यांची वेगळ्या बेडची मागणी मान्य झाली आहे.

अनिल देशमुखांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला दरमहा 100 कोटी रूपये वसुलीचं टार्गेट दिलं असल्याचा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. यानंतर अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या. गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देशमुखांवर झालेल्या आरोपांची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी केली जात आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“एकेकाळी सत्तेत असलेले लोक हे करतायेत, हे दुर्दैव आहे”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून शरद पवारांचा सरकारला एका वाक्याचा सल्ला, म्हणाले…

अमरावती आणि पुण्यापाठोपाठ आता ‘या’ शहरातही जमावबंदी लागू

“विक्रमजी, आपल्या वयाचा आदर आहे, मात्र…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More