देवेंद्र फडणवीस…’हा’ बडा नेता स्वतःच्या अटकेची वाट पाहतोय

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis l सध्या राजकारणात अनेक मोठे गौप्य्स्फोट होत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे. कारण भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर करण्यात आला आहे.

अनिल देशमुखांनी फडणवीसांवर केला हल्लाबोल :

मात्र अशातच आता याप्रकरणी अनिल देशमुख यांनी एक ट्वीट केल आहे. त्या ट्विटमध्ये अनिल देखमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत एक्सवरुन एक ट्वीट केल आहे.

गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी अनिल देशमुख यांनी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकला असा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आता अनिल देशमुख ट्विट करत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे.

https://x.com/AnilDeshmukhNCP/status/1833333163214705034?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1833333163214705034%7Ctwgr%5E7ee6f98c7011621b5de26fb1554978e592dd32b5%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fmaharashtra%2Fanil-deshmukh-tweet-about-girish-mahajan-devendra-fadnavis-cbi-files-case-to-pressurise-police-1266922.html

Devendra Fadnavis l अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले? :

“देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 4 वर्षापूर्वीची घटना उकरुन काढत माझ्याविरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR माझ्याविरुद्ध दाखल केली आहे. 4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता असा खळबळजनक आरोप माझ्यावर केला आहे.

तसेच माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकुन मला अट‍क करण्याचा प्रयत्न गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरुण महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना मी सांगु ईच्छीतो की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे”, असा आशयाचं ट्विट अनिल देखमुखांनी केलं आहे.

News Title – Anil Deshmukh Tweet about Girish Mahajan & Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या-

खुशखबर! आयफोन झाले स्वस्त; जाणून घ्या किंमती

राहुल गांधींसोबत दिसलेली ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण?; व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

शुभवार्ता! महालक्ष्मी आगमनाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त, काय आहेत सध्या किंमती?

बाप्पाच्या कृपेने आज मेषसह ‘या’ 5 राशींवर होणार धनवर्षाव!

मोठी बातमी! अभिनेत्री रश्मिका मंदानाचा अपघात, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .