Top News महाराष्ट्र सोलापूर

वारकऱ्यांच्या वेशात गृहमंत्री… अनिल देशमुखांचं पंढरीच्या पांडुरंगाला साकडं

पंढरपूर | आषाढी एकादशीची वारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूरला भेट देऊन सुरक्षा व आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली.

महाव्दार चौकातून दर्शन घेताना गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाला कोरोनामुक्तीचे साकडे घातले. “विठू माऊली तू माऊली जगाची, आर्त साद तुज ही कोरोनामुक्तीची” असे सांगत संपूर्ण जगातून, भारत व महाराष्ट्रातून या कोरोनाला घालव आणि शतकांपासून चालत आलेली वारीची परंपरा पूर्ववत लवकरच सुरू होण्यासाठी आशिर्वाद असू द्या” या शब्दांत साकडे घातले.

पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचा असेल. त्या निर्णयाबाबत भाविकांनी व जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन गृहमंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी केले. गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांना वीणा, वारकरी पारंपरिक पोशाख, तुळशी हार देण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी गृहमंत्र्यांना दिली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ.भारत भालके उपस्थित होते.

ट्रेंडिंग बातम्या-

…तर कोरोनाची ही लढाई कदापि जिंकता येणार नाही- देवेंद्र फडणवीस

‘कोणाच्या धमकीला घाबरत नाही’; चंद्रकांत पाटलांचं हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर

महत्वाच्या बातम्या-

शेळ्या-मेंढ्या चारल्या म्हणून गुन्हे दाखल करणं थांबवा- असीम सरोदे

अकोला कारागृहातील तब्बल 50 कैद्यांना कोरोनाची लागण

शुभमंगल साssवधान!, लग्नासाठी बोलावलेल्या पाहुण्यांपैकी 15 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या