बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुखांना बार मालकांनी दिले तीन महिने 4 कोटी रूपये; ईडीचा धक्कादायक खुलासा

मुंबई | ईडीकडून आज सकाळपासून चार वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचाही समावेश आहे. अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर या ठिकाणच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे.

ईडीने त्यांच्या घरी का छापे टाकले यांचं कारण अद्याप समोर आलं नव्हतं. त्यामुळे राज्यात अनेक प्रकारच्या चर्चाँना उधाण आलं होतं. परंतू इतक्यात यामागचं कारण समोर आलं आहे. मुंबईतील 10 बार मालकांनी सलग तीन महिने अनिल देशमुख यांना 4 कोटी रूपये दिले असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीने अनिल देशमुख यांच्या घरी छापा टाकला असल्याचं समजत आहे.

अर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबईतील 10 बार मालकांचे जबाब ईडीने नोंदवून घेतले आहेत. तसेच पोलीस अधिकाऱ्यांना 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याच्या आरोपाप्रकरणी अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशी सुरू असल्याचंही समोर आलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास अजूनही ईडी करत आहे. त्यामुळे या तपासादरम्यान कोणकोणते धागे-दोरे ईडीच्या हाती लागतात. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

जवानानं धावत्या रेल्वेतून कोसळणाऱ्या प्रवाशाचे वाचवले प्राण, रेल्वेमंत्र्यांकडून कौतुकांचा वर्षाव

“करावं तसं भरावं, त्यामुळे राष्ट्रवादीने ईडीच्या कारवाईवर राजकारण करू नये”

“केंद्र सरकार आपल्या कर्तव्यात चुकल्यामुळेच ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलं”

रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा मैदानात! अमेरिकन पाॅप स्टार ब्रिटनी स्पीअर्सच्या स्वातंत्र्यची मागणी

कोरोनाच्या घातक डेल्टा प्लस विषाणूने या जिल्ह्यात पहिला बळी; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More