Anil Deshmukh | महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणूक काळात एक पुस्तक प्रकाशित होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नवं पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ असं अनिल देशमुख यांच्या पुस्तकाचं नाव आहे
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकात सत्ताधाऱ्यांवर मोठे आणि गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मागे केंद्र सरकारच्या आशीवार्दाने ईडी, सीबीआय मागे लागली. मला जेलमध्ये टाकण्यात आले. कशा पद्धतीने माझ्याविरोधात राजकीय कट करण्यात आला. याची सर्व माहिती मी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकात सविस्तर दिल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
अनिल देशमुख यांच नवं पुस्तक
अनिल देशमुख यांनी एक ट्विट केले आहे. राजकारणातील टरबुज्या या नावाने केलेले ते ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
या पुस्तकात टरबूजाच्या विकृत राजकारणाचे खरे रूप जनतेसमोर आणणारे अनेक धक्कादायक खुलासे आहेत, असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं आहे. सरकारचा एक दूत समित कदम आपल्यावर सातत्याने दबाव आणत होता. खोटं शपथपत्र सादर करण्यास आपल्याला भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपण दबावाला झुकलो नाही. त्यामुळेच या दिव्यातून जावे लागल्याचा दावा देशमुखांनी केला आहे.
Anil Deshmukh यांचा खुलासा
1 नोव्हेंबर 2021 ला अनिल देशमुख यांनी ईडीच्या चौकशीला हजेरी लावली. ऐन दिवाळीच्या तोंडावर अनिल देशमुख यांच्या झालेल्या चौकशीचा या पुस्तकात उल्लेख आहे. मी स्वत: हून ईडीच्या कार्यालयात गेलो. त्यावेळी मी असं चौकशीसाठी येणं अपेक्षित नव्हतं. त्यांच्याकडे दिवाळीचा माहौल होता. पण मी चौकशीला गेल्याने त्यावर विरझण पडलं. तुम्ही चौकशीसाठी आजचाच दिवस का निवडला? आमची सगळ्यांची दिवाळी खराब करून टाकली, असं त्या अधिकाऱ्याने म्हटलं. दिवाळी तर माझीही खराब होणार होती. पण मी न्यायासाठी आनंदावर पाणी सोडायला तयार होतो, असा प्रसंग अनिल देशमुख यांच्या पुस्तकात लिहिण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
2025 मध्ये ‘या’ 4 राशींना शनी बनवणार धनवान
‘बिग बाॅस’ फेम जान्हवी किल्लेकरने केला लिलाव?; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
कसब्यातील भाजपचा उमेदवार ठरला; ‘हा’ नेता देणार धंगेकरांना टफ फाईट
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा झटका!
शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर! पाहा संपूर्ण यादी एका क्लीकवर