बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलग दुसऱ्या दिवशीही अनिल देशमुखांच्या मालमत्तेवर आयकर विभागाची छापेमारी

नागपूर | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. अशातच आता अनिल देशमुख यांच्या नागपुरातील मालमत्तेवर काल आयकर विभागानं छापा टाकला.

काल नागपूरमध्ये अनिल देशमुखांच्या घरी छापा टाकल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही त्यांच्या नागपूरमधील कार्यालयांवर छापेमारी केली आहे. आज आणखी साई शिक्षण संस्थेच्या रामदास पेठ येथील कार्यालयावर छापे टाकत कसून चौकशी करण्यात आली. यावेळी काही महत्वाची माहिती प्राप्तीकर विभागाच्या हाती लागल्याचं समजत आहे.

काल आयकर विभागाच्या छापेमारीत अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आयकर विभागाकडून तब्बल 16 तास झाडाझाडती करण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये अनिल देशमुखांकडून कोट्यावधींचे व्यवहार झाले, या व्यवहारांच्या संदर्भात आयकर विभागानं चौकशी केली.

दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची धाड पडल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे आणखी काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘दिवाळीपूर्वीच अनिल देशमुख तुरुंगात जाणार, त्यानंतर…’; सोमय्यांच्या वक्तव्याने खळबळ

मोठी बातमी! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात दाखल

पुढील दोन-तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा इशारा

सोनू सूदवर गंभीर आरोप; Income Tax च्या छापेमारीनंतर धक्कादायक माहिती समोर

“मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More