बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर काल अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी म्हणजे नागपूरमध्ये ईडीने छापे टाकले होते. त्यासोबतच त्यांच्या वरळीच्या निवासस्थानावरही छापेमारी सुरू होती. आता याच प्रकरणात पुढील कारवाई करताना ईडीने दोन जणांना अटक केल्याने अनिल देशमुख यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

संजीव पालंडे आणि कुंदन शिंदे या दोघांना ईडीने अटक केली आहे. पीएमएलए कायद्यांतर्गत ही करावाई करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी प्रश्न विचारले असताना संजीव पालंडे आणि कुंदन शिंदे यांनी सहकार्य केलं नाही. यामुळे आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात दोघांना चौकशीसाठी अटक केली आहे, अशी माहिती ईडीने दिली आहे.

ईडीचे अधिकारी आले होते. त्यांना सहकार्य करण्यात आलं. परमबीर सिंह यांना आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर माझ्यावर खोटे आरोप केले, त्यांनी पोलीस आयुक्त पदाच्या खुर्चीवर बसलेले असताना आरोप का केले नाही, असा सवाल अनिल देशमुख यांनी केला आहे. मुंबईतील 10 बार मालकांनी सलग तीन महिने अनिल देशमुख यांना 4 कोटी रूपये दिले असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर ईडीने अनिल देशमुख यांच्या घरी छापा टाकला होता.

दरम्यान, परमबीर सिंह यांनी आयुक्त पदाच्या खुर्चीवर होते तेव्हा त्यांनी आरोप का केले नाही, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित करत एनआयएच्या तपासात सत्य समोर येईलच असा विश्वास व्यक्त केला. तसेच माझ्याकड़ून केंद्रीय तपास यंत्रणाना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं देशमुख म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘या’ माजी केंद्रीय मंत्र्याचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

‘हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त असतील पण…’; खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप ओबीसी आरक्षणावर आक्रमक पवित्रा; आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

‘कर नाही, तर डर कशाला’; प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला

जे आहे मराठा समाजाचे खणखणीत नाणे, त्याचं नाव नारायण राणे- रामदास आठवले

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More