मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला. विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढत टीकेची तोफ डागली. या सर्व प्रकरणानंतर याचे पडसाद संसदेतही उमटताना दिसले.
हे सर्व प्रकरण न्यायालयाच्या कक्षेत गेलं आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी ते पदावर असल्याने पोलिसांकडून निष्पक्ष होईल असं वाटत नसल्यामुळे सीबीआयला या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. तर आपल्या पदाचा राजीनामा देऊन अनिल देशमुख हे थेट दिल्लीला रवाना झाले.
अनिल देशमुख यांनी दिल्लीत काँग्रेसचे नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे अनिल देशमुख हे आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे सीबीआयचं पथक या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आज मुंबईत दाखल होणार आहे.
अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला 15 दिवसांचा कालावधी दिला आहे. यादरम्यान सीबीआयला चौकशीमध्ये काही तथ्य आढळल्यास एफआयआर नोंद करण्याच्या सूचनाही मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या. संबंधित प्रकरणात सीबीआयचे अधिकारी आज मुंबईत दाखल होऊन सर्वप्रथम परमबीर सिंह यांचा जबाब नोंद करून घेऊ शकतात.
थोडक्यात बातम्या –
‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कळवण्यात येते की…’; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश
“महाराष्ट्रातील घाणेरड्या राजकारणामुळे मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला”- संजय राठोड
“फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आश्वासनानंतरच राज्यात मिनी लाॅकडाऊन लागू”
सोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर
‘ब्रेक दि चेन’ मोहीमेअंतर्गत महाराष्ट्र सरकारची नवी सुधारीत नियमावली जाहीर, वाचा सविस्तर
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.