बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली | पत्रकार परिषदेत घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुखांचा बचाव करत परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाचं खंडन केलं आहे. त्यानंंतर पत्रकारांच्या प्रश्नांवर शरद पवारांनी एक एक करत उत्तरे दिली. परंतू जर अनिल देशमुख 15 तारखेला रूग्णालयात असतील तर त्यांनी पत्रकार परिषद कशी काय घेतली?, असा सवाल पत्रकारांनी पवारांना केला. त्यावर शरद पवारांना उत्तर देता आलं नाही. यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विटरवर व्हिडीओ ट्विट करत याबाबत खुलासा केला आहे.

मला कोव्हिड झाल्याने मी 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी रुग्णालयात अॅडमिट होतो. 15 फेब्रुवारीला डिस्चार्ज मिळाला. तिथून बाहेर पडत असताना अनेक पत्रकार गेटवर उभे होते. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. माझ्या अंगात विकनेस होता. त्यामुळे रुग्णालयाच्या इथे पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर देऊन मी होम क्वारंटाईन झालो. त्यानंतर 28 फेब्रुवारीला मी सह्याद्री गेस्ट हाऊसला पहिल्यांदा आलो, असं स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिलं आहे.

अनिल देशमुख 15 तारखेला रूग्णालयात असतील तर त्यांनी पत्रकार परिषद कशी काय घेतली? असा प्रश्नांचा सडा पत्रकारांकडून लावण्यात आला होता. त्यावेळी मला यातील काही माहिती नाही. माझ्या माहितीनुसार अनिल देशमुख त्या दिवशी रूग्णालयात होते, असं पवार म्हणाले होते. तर या प्रश्नावर ‘इनफ इज इनफ’ म्हणत शरद पवारांनी याविषयी अधिक बोलणं टाळलं.

दरम्यान, सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून हा वाद शमवन्याचा प्रयत्न केला जात आहे. तर विरोधक या प्रकरणावरून वेळोवेळी प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ- 

 

थोडक्यात बातम्या- 

पुण्याची मान शरमेनं खाली!; महिलांवरील ‘या’ अत्याचारात पुणे सर्वात पुढे!

मुलगी लग्नास तयार होत नव्हती म्हणून… बापाच्या कृतीनं महाराष्ट्र हादरला!

“अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते”; पवारांच्या या दाव्यानंतर देशमुखांच्या जुन्या ट्विटखाली गदारोळ सुरु

“त्या पत्रामागे खूप मोठं कारस्थान, परमबीर सिंहांना माफीचा साक्षीदार करणार”

परमबीर सिंग यांचे आरोप तथ्यहीन, अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही- शरद पवार

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More