अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता
मुंबई | परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विरोधकांनीही अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेल्या अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकार आता एक निवृत्त न्यायमूर्तींची चौकशी समिती बनवून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकार या समितीवर हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती नेमणार असल्याचं कळतंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक बोलावली आहे. त्यावेळी महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच परमबीर सिंग यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत. त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी परमबीर सिंग यांनी या याचिकेद्वारे केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निप:क्ष, प्रभावहीन आणि कोणतीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सतत्या तपासणे आवश्यक आहे. अनिल देशमुखांनी फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांच्या निवासस्थानी सचिन वाझे आणि संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या दोघांच्या वरिष्ठांना डावलून ही बैठक झाली होती. त्या बैठकीत महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट अनिल देशमुखांनी दिलं होतं, असं परमबीर सिंह यांनी याचिकेत म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘मला पवारांसारखं इंग्रजी येत नाही’; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला
‘धन्यवाद मोदी सरकार’, राष्ट्रवादीकडून पुण्यात बॅनरबाजी; वाचा काय आहे प्रकरण
नव्या बदलासह नवी ‘Royal Enfield’ लवकरच भारतीय बाजारात धडकणार
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांना जयंत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
15 वर्षाच्या लेकीने सख्ख्या आईची गळा चिरून केली हत्या; कारण ऐकून सुन्न व्हाल
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.