आमदार अनिल गोटेंचा भाजपला आणखी एक मोठा धक्का

धुळे | धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी भाजपला आणखी एक धक्का दिला आहे. शहरात ज्या ठिकाणी त्यांच्या लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार नाहीत अशा ठिकाणी त्यांनी शिवसेनेला समर्थन दिलं आहे.

आमदार अनिल गोटे अशा 5 ठिकाणी शिवसेनेसाठी मत मागणार आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गोटेंनी ही शक्कल लढवली आहे.

अनिल गोटे यांनी धुळे महापालिकेच्या निवडणुकीत 74 पैकी 62 ठिकाणी आपल्या लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार दिले आहेत.

भाजपमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे अनिल गोटे दुखावले गेले आहेत. त्यांनी भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-गिरीश महाजनांसारख्या आरतीबाज लोकांपासून मुख्यमंत्र्यांनी सावध राहावे!

-रामराजे नाईक निंबाळकरांवर गुन्हा दाखल करा; आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-नारायण राणे संपले नाहीत अजून; विरोधकांनी लक्षात घ्यावं!

-धनगर आरक्षणासाठी भाजप खासदार रस्त्यावर; जाळला महायुतीचा वचननामा!

-मराठा आरक्षणाविरोधात याचिका हा तर विरोधकांचा डाव!