गोपीनाथ मुंडे असते तर भाजपनं आज गुंडांना पक्षात घेतलं असतं का?

धुळे | राजकारणातील गुन्हेगारीकरणाच्या विरोधात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती. ते आज असते तर भाजपनं गुंडांना पक्षात घेण्याचे धाडस केले असते का? असा सवाल भाजप आमदार अनिल गोटे यांनी संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांना केला आहे.

शहर गुंडगिरीमुक्त करण्याच्या मुद्‌द्‌यावर आपण डॉ. भामरेंना तोंडावर तुमची ताकद नसल्याचे म्हटले होते. माझा पक्षप्रवेशाला नाही तर गुंडांच्या शुद्धीकरणाला विरोध आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, भामरे यांनी ज्यांना पक्षात घेतले ते संत आहेत का? अनेकजणांवर किती गुन्हे दाखल आहेत याची कागदपत्रेही आपल्याकडे आहेत, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-पुण्याला एक नंबरचं शहर बनवणार; देवेंद्र फडणवीसांंचं आश्वासन

-बारामतीच्या न्यायालयाकडून राज ठाकरे यांना दिलासा!

-विरेंद्र सेहवागनं महिला क्रिकेटसंघाला दिला ‘हा’ कानमंत्र

-भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असेल तर मनेका गांधींना मंत्रिमंडळातून काढून टाकावं!

-उंदराचेही बरोबर आणि मांजराचेही बरोबर म्हणत भाजपवाले जनतेला मूर्ख बनवतायेत!