आदर्श घोटाळ्याची इमारत आमदारांना द्या- अनिल गोटे

मुंबई | आदर्श घोटाळ्यातील इमारत सध्या सडत पडलेली आहे. या इमारतीचा सदुपयोग करण्यासाठी ती आमदारांना द्या, अशी मागणी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलीय.

मनोरा आमदार निवास पाडून त्याठिकाणी आमदारांसाठी नव्या इमारती उभारण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. आमदारांची तात्पुरती सोय हॉटेलमध्ये करण्याचा सरकारचा विचार आहे, मात्र त्याऐवजी अनिल गोटेंनी हा मार्ग सुचवला आहे.

दरम्यान, आदर्श घोटाळा झाल्यापासून ही इमारत मोकळीच पडून आहे.