नाशिक महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांना पहिल्यांदा चंपा कुणी म्हटलं? अनिल गोटेंनी जाहीर केलं ‘त्यांचं’ नाव

जळगाव |  चंद्रकांत पाटील यांना चंपा नाव कुणी ठेवलंय हे बहुतेक त्यांनाही माहिती नसावं. पण गिरीश महाजन यांनी त्यांचं नाव चंपा ठेवलंय, असं राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे म्हणाले आहेत. तसंच त्यांना चंपा म्हटल्यावर मला खूप दु:ख होत असल्याचं देखील गोटे म्हणाले.

भाजपमध्ये स्वत:चं नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची पध्दत आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘नमो’ म्हणतात तसंच गृहमंत्री अमित शाहांना ‘मोटाभाई’ म्हणतात तसंच चंद्रकांत पाटील यांनाही चंपा म्हणत असावेत, असा अंदाजही गोटे यांनी लावला आहे.

देवेंद्र फडणवीसांना भाजपमधील विरोधी गटात असलेले अनेक नेते ‘टरबुज्या’ म्हणायचे… आता तर तेच नामकरण सर्वश्रुत झाले, त्याला विरोधी पक्ष तरी काय करणार? असंही त्यांनी म्हटलं.

भाजपमधील नेत्यांचे बारसे अन्य कुणी करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही. आपापसातील व्देष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की, त्यांनीच एकमेकांचे नामकरण करुन गुपचूप बारसे साजरे केले, असा टोमणाही त्यांनी मारला.

ट्रेंडिंग बातम्या-

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना!

काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा, हा बडा नेता पुन्हा दिल्लीत!

महत्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे- अनिल गोटे

…म्हणून नागपुर, मालेगाव आणि धारावीतला कोरोना आटोक्यात, राजेश टोपेंचा महत्त्वाचा खुलासा

कोरोनाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली- गृहमंत्री अनिल देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या