Top News नाशिक महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे- अनिल गोटे

जळगाव |    देवेंद्र फडणवीसांना भाजपमधील विरोधी गटात असलेले अनेक नेते ‘टरबुज्या’ म्हणायचे… आता तर तेच नामकरण सर्वश्रुत झाले, त्याला विरोधी पक्ष तरी काय करणार? असं राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी म्हटलंय. अनिल गोटे यांनी एक पत्रक काढलं आहे. यामध्ये त्यांनी विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली आहे.

भाजपमधील नेत्यांचे बारसे अन्य कुणी करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही. आपापसातील व्देष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की, त्यांनीच एकमेकांचे नामकरण करुन गुपचूप बारसे साजरे केले, असा टोलाही त्यांनी पत्रकातून लगावला आहे.

भाजपमध्ये स्वत:चं नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची पध्दत आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘नमो’ म्हणतात तसंच गृहमंत्री अमित शाहांना ‘मोटाभाई’ म्हणतात, असंही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना मी महारोग म्हणालो नाही. संतापाच्या भरात वगैरे काही बोललो नाही. उलटपक्षी माझ्या मनात उसळलेल्या संतापाच्या ज्वालामुखीची आग बाहेर पडू नये म्हणून संयमी वक्तव्य केले, असंही गोटे म्हणाले.

पत्रकात प्रसिध्दी माध्यमांशी जे बोललो तेच माझ्या पत्रकात आहे. शांत डोक्याने संतापावर नियंत्रण ठेवून लिहले आहे. फडणवीसांना महारोगाची उपमा दिली. ‘महारोगी’ असे म्हणालो नाही. याचे भान भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठेवावे, असं पत्रक अनिल गोटे यांनी लिहिलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना!

काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा, हा बडा नेता पुन्हा दिल्लीत!

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून नागपुर, मालेगाव आणि धारावीतला कोरोना आटोक्यात, राजेश टोपेंचा महत्त्वाचा खुलासा

कोरोनाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली- गृहमंत्री अनिल देशमुख

गुन्हे सिद्ध करण्यात लॅबचे महत्वपूर्ण योगदान, गृहमंत्री अनिल देशमुखांचे कौतुकोद्गार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या