भाजपला धक्का!!! धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार

धुळे | धुळ्यातील भाजपचे आमदार अनिल गोटे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे भाजपला 1 महिन्यात दुसरा धक्का बसला आहे. 

2 दिवसांपूर्वी धुळे येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विजय संकल्प मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात अनिल गोटेंना बोलण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. 

त्यावर गोटेंच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. हा वाद वाढला आणि कार्यकर्त्यांमध्ये खुर्च्यांची फेकाफेकीही झाली. त्यानंतर त्यांनी राजीनामा देणार असल्याचं सांगितल्यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

दरम्यान, मेळाव्यातील प्रसंगानंतर गोटेंनी धुळ्याच्या महापौरपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र अखेर त्यांनी पक्षच सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-असशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही!

-राजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही!

-#MeToo | एखादं नातं खराब असेल तर ते #MeToo नाही; कुक्कु नवाजुद्दीनच्या पाठीशी

-गोव्यात गोमांस बंदी करा, मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल!

-नाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी आणण्याची तयारी