महाराष्ट्र मुंबई

ट्विटरवर उडाला वादाचा भडका; अनिल कपूर आणि अनुराग कश्यप भिडले!

मुंबई | अभिनेता अनिल कपूर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपमध्ये ट्विटर वॉर रंगलं आहे. ट्विटच्या माध्यमातून दोघांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले आहेत.

‘दिल धडकने दो’ मधील आपली सहकारी शेफालीचं कौतुक करणारं ट्विट अनिल कपूरने केलं. अनिल कपूरच्या याच ट्विटला रिट्विट करत अनुराग कश्यपने अनिलवर निशाणा साधला. यानंतर अनिल कपूरनेही अनुरागला उत्तर दिलं.

दिल्ली क्राइम सीरिजच्या टीमचे कौतुक करत अनिल कपूर यांनी एक ट्विट केलं. तुम्ही डिझर्व्ह करता, चांगलं वाटतं जेव्हा लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळते. याच ट्विटला रिट्विट करत अनुराग कश्यपने म्हटलं, मलाही चांगलं वाटतं जेव्हा काही चांगल्या लोकांचं आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव होतं. बाय द वे, आपला ऑस्कर कुठे आहे, ओ सॉरी नामांकन, असं ट्विट करत अनुरागने अनिल कपूरवर निशाणा साधला.

तुम्ही तर ऑस्करच्या जवळ तेव्हा आला होतात जेव्हा आपण टीव्हीवर Slumdog Millionaire ला ऑस्कर जिंकताना पाहिलं. जाऊ द्या… तुम्हाला नाही जमणार, असं जोरदार प्रत्युत्तर अनिल कपूरने दिलं.

 

 

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

”दिल्लीच्या आंदोलनात शेतकऱ्यांपेक्षा हमाल अधिक, हे सर्व भामटे लोक”

‘मी देशातील प्रत्येक शेतकऱ्यासोबत उभा आहे’; रितेश देशमुखचाही शेतकरी आंदोलनाला पाठींबा

‘सोशल मीडियावर फक्त रिकामटेकडे लोक असतात’; कंगणा राणावतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘मिळालेला मंत्रिपदाचा तुकडा जपण्यासाठी बच्चू कडू…’; भाजपची मंत्री कडूंवर जहरी टीका

“पवारांचा कृषी कायद्यांच्या मूलतत्त्वांना विरोध नाही काही जण वाहत्या गंगेत हात धुताहेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या