मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाबाबत अनिल कपूर यांचा मोठा खुलासा!

Anil Kapoor | बॉलिवुड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) नेहमीच आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. अनेक कार्यक्रमात ते दोघे एकत्र दिसून येतात. दोघेही एकमेकांचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशात त्यांच्या लग्नाबाबत मोठा खुलासा झाला आहे.

बॉलीवुड अभिनेते अनिल कपूर सध्या बिग बॉस ओटीटी 2 ला होस्ट करताना दिसत आहेत. कालच बिग बॉस ओटीटीचा प्रीमियर झाला. या दरम्यान, अनिल कपूर यांनी मुलाखत दिली. याच मुलाखतीमध्ये त्यांनी अर्जुन कपूरच्या लग्नाबाबत खुलासा केला.

अनिल कपूर यांचा मोठा खुलासा

कपूर खानदानामध्ये आता कोणाचे लग्न सर्वात अगोदर होणार आहे?, असा प्रश्न मुलाखतीमध्ये अनिल कपूर यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी, अर्जुन कपूर याचे लग्न अगोदर होईल,असं उत्तर दिलं. त्यामुळे आता लवकरच अर्जुन आणि मलायका दोघेही लग्न बंधनात अडकणार असल्याच्या जोरदार चर्चा होत आहेत.

स्वतः अनिल कपूर (Anil Kapoor) यांनीच याबाबत मोठी हिंट दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मलायका अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. यावर अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठा संताप व्यक्त केला होता.

मलायका-अर्जुन कपूर लवकरच करणार लग्न?

तर, त्यापुर्वी अर्जुन आणि मलायका यांच्यात भांडण झाली असून दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार, असंही म्हटलं गेलं. मात्र, नंतर मलायकाने या सर्व चर्चा अफवा असल्याचं म्हटलं होतं.आता पुन्हा एकदा हे जोडपं चर्चेत आलंय. सध्या चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत.

मलायका आणि अर्जुन यांनी 2018 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. 2019 मध्ये त्यांनी आपलं नातं जगजाहीर केलं. सध्या मलायका अरोरा ही 50 वर्षाची आहे तर अर्जुन कपूर हा 38 वर्षाचा आहे. दोघांच्या वयामध्ये 12 वर्षाचे अंतर आहे. अशात अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी त्यांच्या लग्नाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

News Title – Anil Kapoor Big Statement on Arjun Kapoor Marriage

महत्वाच्या बातम्या-

राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा; ऑरेंज अलर्ट जारी

“जरांगेंना शरद पवारांचं पाठबळ, त्यांनी नेहमीच ओबीसीविरोधी भूमिका घेतली”

शिवभक्तांनो उज्जैनच्या महाकालेश्वरासह ‘या’ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी; जाणून घ्या अधिक

केसातील कोंड्यापासून सुटका हवीये? तर ‘या’ आयुर्वेदिक गोष्टी केसांना लावा

“मनोज जरांगेंची उंची आहे का?, कोण कोणाला पाडतं दाखवून देऊ”; ‘या’ नेत्याचा थेट इशारा