बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सेक्स, सेक्स आणि सेक्स…’; अनिल कपूरचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

मुंबई | ‘कॉफी विथ करण’चा (Koffee With Karan) सातवा सीझन सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शो दरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींनी केलेल्या खुलाशांमुळे शो चर्चेत असतो. हा शो जितका लोकप्रिय आहे तितकाच वादग्रस्त देखील आहे.

कॉफी विथ करणच्या पुढच्या एपिसोडमध्ये अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आणि वरूण धवन (Varun Dhawan) हजेरी लावणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला. यात अनिल कपूरने केलेल्या एका खुलास्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

या प्रोमोत करण जोहरने (Karan Johar) अनिल कपूर यांना त्यांच्या चिरतारूण्याचं रहस्य विचारलं. यावेळी अनिल कपूरने सेक्स, सेक्स आणि सेक्स यामुळे मला चिरतरूण वाटत असल्याचं सांगितलं.

दरम्यान, अनिल कपूरचं उत्तर ऐकून वरूण आणि करण दोघंही हसू लागले. तर या प्रोमोनंतर हा शो स्क्रिप्टेड असल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

Tags:

अनिल कपूर श्रीदेवी, अनिल कपूर का परिवार, अनिल कपूर – विकिपीडिया, अनिल कपूर की उम्र, अनिल कपूर कितने भाई हैं, अनिल कपूर की बेटी, अनिल कपूर का भाई कौन है, anil kapoor wife, anil kapoor brother, anil kapoor age, anil kapoor son, anil kapoor father, anil kapoor daughter, anil kapoor net worth

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More