बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुला 1 मे आधी लस मिळालीच कशी”; मुलानंच घेतली अनिल कपूरची फिरकी

मुंबई | बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अनिल कपुरने कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. लस घेतानाचा फोटो त्याने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. मात्र त्यानंतर सोशल माध्ममांवर काही भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपुर्वीच केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला होता. यावरूनच चाहते अनिलची फिरकी घेत आहेत.

अनिल कपुरचं वय आता 64  आहे परंतू दिवसेंदिवस तो तरूण होत चालला आहे. कारण त्याच्या चेहऱ्यावरील तेज आणि त्याची पर्सनालिटी यावरून तरी कोण म्हणणार नाही की अनिल कपूरचं वय 64 असेल. चाहत्यांनी तर फिरकी घेतलीच पण त्याचा मुलगा हर्षवर्धननेही अनिलच्या लस घेतानाच्या फोटोवर, तुम्ही दुसरा डोस कसा घेतला? मुळात 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तिला लस मिळालीच कशी?, अशी मजेशीर कमेंट केली आहे.

अनिलनेही आपल्या चाहत्यांना उत्तर दिलं आहे. अरूण म्हणाला की, लस देणाऱ्या लोकांनी जर माझी आधारकार्डवरची जन्मतारीख नसती पाहिली तर त्यांनीही मला 1 मेनंतरच यायला सांगितलं असतं. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनीही अनिलच्या फोटोवर अशाचप्रकारे कमेंट केली आहे. तू तर 18 वर्षांपेक्षाही कमी वयाचा आहेस, असं राकेश मेहरा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशभरात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांना हि लस उपलब्ध करून देण्यात आली. तसेच त्यानंतर 45 वर्षांवरील सरसकट सर्वांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. 1 मे 2021 पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यामध्ये आता 18 वर्षांवरील सर्व लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

थोडक्यात बातम्या- 

आता ताप कोणताही असो कोरोना चाचणी होणार; ‘या’ जिल्ह्यासाठी नवा नियम

“आपल्याला तज्ज्ञांपेक्षा जास्त कळतं असं मोदींना वाटत असल्याने भारतावर ही वेळ आली”

राज्यात ऑक्सिजन वाहतुकीसाठी आता एअरफोर्सचीही मदत घेतली जाणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

विरारच्या आगीत पतीचा मृत्यू, बातमी समजताच कोरोनाग्रस्त पत्नीनेही सोडला प्राण

“मुख्यमंत्र्यांचा दुसऱ्या लाटेचा अंदाज अचूक ठरला, पण तयारी काय केली सांगा?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More