कोहलीच्या त्या वक्तव्याने मला धक्काच बसला, कुंबळेचा आरोप

नवी दिल्ली | प्रशिक्षकपदावरुन पायउतार होताना अनिल कुंबळेने धक्कादायक खुलासा केलाय.

कर्णधार विराट कोहलीला माझ्या कामावर आक्षेप होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला हे काल समजलं, असं कुंबळेने म्हटलंय.

मी कायमच कर्णधार आणि प्रशिक्षक यांची सीमा ओळखून काम केलं. त्यामुळे विराटच्या या वक्तव्याने धक्का बसल्याचं अनिल कुंबळेने म्हटलंय.

तसंच बीसीसीआयने आमच्यातील मदभेद दूर करण्याचा प्रयत्न केला पण आता बीसीसीआयने पात्र व्यक्तीला हे पद द्यावं, असं कुंबळेने म्हटलंय.