अनिल कुंबळेचा भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळेने आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिलाय.

कर्णधार विराट कोहलीसोबत सुरु असलेल्या कथित वादामुळे त्यानं हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कुंबळेच भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असेल असं नुकतंच बीसीसीआयनं जाहीर केलं होतं.

मात्र कुंबळेने आपला करार पुढे सुरु ठेवण्यात नकार दिलाय. त्यामुळे तोंडावर असलेल्या विंडीज दौऱ्यासाठी भारताला दुसरा प्रशिक्षक शोधावा लागणार आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या