बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परिवहन मंत्री अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; पाहा कुणी केली ही मागणी?

मुंबई | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या अटकेची देखील मागणी केली जात आहे. आमदार नितेश राणे यांनी ही मागणी केली आहे.

राज्यातील महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवास दिला जाईल, त्यासाठी १० हजार बस सोडण्यात येतील, अशी घोषणा अनिल परब यांनी केली होती. मात्र त्यानंतर राज्य सरकारने आदेश काढून फक्त स्थलांतरित नागरिकांसाठी एसटी सेवा सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.

परब यांच्या फसव्या वक्तव्यामुळे काल राज्यात ठिकठिकाणी एसटीसाठी हजारो लोकांचा जमाव पाहायला मिळाला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे दिशाभूल करणारं आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडेल, असं वक्तव्य केल्यामुळे अनिल परब यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करतो आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे नितेश राणेंनी परबांच्या अटकेची मागणी केलीय. चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवत एबीपी माझाच्या पत्रकाराला अटक केली, आता अनिल परब यांना अटक होणार का?, असा सवाल राणेंनी विचारला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘दारुची दुकानं सुरु केली मग मंदिरही खुली करा’; मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊन आणखी वाढवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकेत, मात्र….

गुडन्यूज… गेल्या २४ तासात या १० राज्यात कोराना एकही नवा रुग्ण आढळला नाही

80 वर्षांच्या आजी-आजोबांनी केलं असं काही वाचून तुम्हालाही त्यांचा अभिमान वाटेल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More