Top News आरोग्य

परिवहन मंत्री अनिल परब यांची उपचारांनंतर कोरोनावर मात

मुंबई | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. अखेर उपचारांनंतर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

अनिल परब यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिलीये. ते म्हणाले, “कोविड19 चे निदान झाल्यामुळे मी गेल्या सोमवारी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशिर्वादाने मला कमीत कमी वेळेत डिस्चार्ज मिळाला असून मी आज सुखरूप घरी परतलो.”

“काही दिवसांच्या विलगीकरणानंतर मी आपल्या सेवेसाठी पुन्हा सज्ज होईन. आपण माझ्याप्रति दाखवलेल्या प्रेम व शुभेच्छांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन,” असंही परब यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांच्याकडून नवरात्रीच्या शुभेच्छा!

पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

देवेंद्र फडणवीसांचं बिहारमधून उद्धव ठाकरेंना पत्र; केली ‘ही’ मागणी

दसऱ्याच्या मुहूर्तावर जिम सुरु होणार; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या