बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझ्या मुलीची अन् बाळासाहेबांची शप्पथ घेऊन सांगतो…- अनिल परब

मुंबई | राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने शुक्रवारी दुसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे. त्यानुसार अनिल परब आज ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी माझ्या मुलीची आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की, मी काहीच चुकीच काम केलं नाही, मला ईडीचा दुसरा समन्स आल्याने मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असं परब म्हणाले.

मी ईडीच्या कार्यालयात जात असुन तपासाला सहकार्य करणार आहे. चौकशीत जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

मला ईडीने कशासाठी बोलावल आहे हे मला माहीत नाही. त्यावर ईडीने कोणतही स्पष्ट कारण दिलेलं नाही. परंतु, चौकशीसाठी गेल्यानंतर अधिकृतपणे मला कळेल, असं अनिल परब म्हणाले आहेत.

दरम्यान, आज ईडीच्या चौकशीसाठी अनिल परब जाणार की नाही याबाबत शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र, अनिल परब यांनी चौकशीसाठी सहकार्य करणार असल्याच सांगून उपस्थिती दर्शविली आहे. अनिल परब यांच्यावर बीएमसी कंत्राटदाराकडून वसुली करण्याचा आरोप आहे.

थोडक्यात बातम्या- 

“उद्धव ठाकरेंनी यांना सरकारमध्ये घेतलं तेव्हा मेलेले जिवंत झाले”

MPSC चा निकाल जाहीर! प्रसाद चौगुले राज्यात प्रथम, तर मुलींमध्ये मानसी पाटील

अनिल परबांनंतर शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या अडचणी वाढल्या

अखेर कन्हैय्या कुमारांची राहुल गांधींना साथ, काँग्रेसमध्ये केला प्रवेश!

2021 वर्षाचा बेस्ट ड्रामा अवॉर्ड महापौर मॅडमना द्यायला पाहिजे- निलेश राणे 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More