बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे, त्यांना तर…”

मुंबई | शिवसेना नेते रामदास कदम (Shivsena Leader Ramdas Kadam) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी रामदास कदमांनी अनिल परबांवर अनेक गंभीर आरोप केले. अनिल परबांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

रामदास कदम यावेळी म्हणाले, अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेली 2 वर्ष ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिल्ह्यात येतात. संपूर्ण जिल्हा त्यांनी वाऱ्यावर सोडला आहे. जिल्ह्यात कुठलाही संपर्क नाही, समन्वय नाही. तालुका प्रमुखांचं नावही त्यांना माहिती नाही, असे आरोप कदम यांनी केला आहेत.

पुढे कदम म्हणाले, पालक म्हणून जिल्ह्यात कोणतंही काम त्यांनी केलेलं नाही. त्यामुळेच जिल्ह्यात आज शिवसेनेविरोधात प्रचंड अंसतोष आहे. त्यांच्या खासगी मालमत्तेविरोधात मी बोलणं म्हणजे शिवसेनेविरोधात बोलण होत नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. शिवाय त्यांच्याविरोधात बोलल्यामुळेच माझ्याविरोधात घोषणा दिल्या गेल्या, असा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून रामदास कदम पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांच्यावर अनेक आरोपसुद्धा करण्यात आले होते. यासंबधीत त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांनी माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न केल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे.

थो़डक्यात बातम्या-

“आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडी सरकार आहे, अशा गर्वात राहू नये”

‘छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना ही छोटी गोष्ट आणि…’; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

धक्कादायक! बूस्टर डोस घेऊनही Omicronची लागण

‘संजय दत्त यांनी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला पण…’; गडकरी म्हणतात…

उठ मराठ्या उठ! महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्याप्रकरणी संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More