बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विलिनीकरण मान्य झालं नाही तर काय?, अनिल परब म्हणतात…

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employee) आंदोलनाला आता जवळजवळ एक महिना होत आला आहे. या आंदोलनावर काही तोडगा निघत नसला तरी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर केली. त्यानंतर कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असतानाही वेतनवाढीनंतर जवळपास 10 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. मात्र, आता उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने विलनीकरणाऱ्या विरोधात निकाल दिला तर काय? अशा प्रश्न निर्माण झाला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, याबाबतील वेगवेगळे पर्याय आहेत. या एसटी कर्मचाऱ्यांची मागणी होती. सातव्या वेतन आयोगानुसार त्यांना पगार मिळाला पाहिजे. त्यामुळे आताचे पगार आणि सातव्या वेतन आयोगानुसारचे पगार यासंदर्भातील निर्णय चर्चा करून घेतला जाईल, असं ते म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले, ‘आम्ही सुरुवातीपासूनच समिती विलिनीकरणाबाबत जो अहवाल देईल तो राज्य सरकारला मान्य असेल, अशीच भूमिका ठेवली आहे. जर समितीन सांगितलं विलिनीकरण व्हायला हवं तर ते आम्ही मान्य करू. पण समितीचा निर्णय यायला 12 आठवडेचा वेळ आहे. तोपर्यंत संप चालू ठेवायचा का? एसटीसारखी मुलभूत सेवा बंद ठेवायची का? म्हणून आम्ही वेतनवाढीचा पर्याय दिला,’ असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक समिती स्थापन करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनेनुसार 12 आठवड्यांच्या आत या समितीला राज्य सरकारला विलिनीकरणाबाबत अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालानंतर राज्य सरकारला विलिनीकरणासंदर्भात निर्णय घ्यावा लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

लालपरी पुन्हा धावली! तब्बल ‘इतके’ कर्मचारी कामावर परतले

‘टोमॅटो पेट्रोलपेक्षाही महागलं’; वाढत्या महागाईवरुन शिवसेनेचे मोदी सरकारवर ताशेरे

“तात्काळ निलंबन करा, संविधान दिनी तरी…”, चित्रा वाघ कडाडल्या

‘…तर भाजपने आता आमच्यासोबत मिळून राज्य करावं’, राऊतांची खुली ऑफर

“तुमचं नेमकं धोरण काय? कोंबड्या वाचवणं की माणसं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More