महाराष्ट्र मुंबई

कुठल्याही ग्राहकाची वीज कापली जाणार नाही- अनिल परब

मुंबई | कुणाचीही वीज कापली जाणार नाही, असं आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलं आहे. ग्राहकांचं विज बिलं तपासून पडताळणी केली जाणार असल्याचं देखील अनिल परब यांनी सांगितलं आहे.

अनिल परब यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. दोघांमध्ये वाढीव वीज बिलाच्या तक्रारींबाबत चर्चा झाली. त्यांच्या चर्चेनंतर अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कुठल्याही ग्राहकाची वीज कापली जाणार नाही, असं अनिल परब यांनी सांगितलंय.

वाढीव वीज बिलाच्या तक्रारीचं निवारण करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. अधिकाऱ्यांनी तक्रारींचे निवारण केलं पाहिजे, अशी मागणी ऊर्जा मंत्र्यांकडे केली आहे. ऊर्जा मंत्र्यांनी ही मागणी मान्य केली आहे, असं अनिल परब म्हणालेत.

ग्राहकांना त्यांच्या वीज बिलात दिलासा मिळेल. ज्यांना वीजबिल जास्त आलं त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाईल, असं अनिल परब म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात कोरोनामुळे 25 जणांचा मृत्यू

सचिन पायलट यांच्या हकालपट्टीनंतर ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले….

‘राजस्थानमध्ये भाजप सरकार येईल अन् महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरेंचं सरकार जाईल’; केंद्रीय मंत्र्याचा खळबळजनक दावा

राज्यात आज 6741 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

‘हे’ कारण देत कोरोना टेस्ट करण्यास रेखाने दिला नकार!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या