मुंबई । राज्यात जारी करण्यात आलेल्या नाईट कर्फ्यूच्या मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली होती. यावरून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसेवर सडकून टीका केलीये.
रात्रीचाच कोरोना असतो का? या अशा प्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते, असा टोला परब यांनी मनसेला लगावलाय.
अनिल परब म्हणाले, “मी तर म्हणतो, सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेतली पाहिजे. सर्वांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहून द्यावं की, कोरोनाचा फैलाव होणार नाही. मग रात्री किंवा दिवसा काय करायचं याबाबत विचार करता येईल.”
“मनसेचं काम हे टीका करणं इतकंच आहे. सध्यातरी दुसरं कोणतंही काम त्यांच्याकडे नाहीये. मुळात टीका करणाऱ्यांना टीकाच करायची आहे”, असंही अनिल परब यांनी मनसेला सुनावलंय.
थोडक्यात बातम्या-
अंबानी पुत्राचा नामकरण सोहळा; आकाश-श्लोकाच्या मुलाचं ठेवलं ‘हे’ नाव
त्रास होत असल्यास शिवसेना सोडून भाजपमध्ये या; राजन यांना खुलं निमंत्र
…तर फडणवीस-मोदींशी चर्चा करून तोडगा काढू’; ‘या’ माजी मंत्र्याने अण्णांना केली विनंती
कोरोनाचा मोठा फटका; रिंकू राजगुरु अडकली या संकटात
…तर नरेंद्र मोदी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील- राहुल गांधी