Anil Parab Sai Resort | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टवर (Anil Parab Sai Resort) होताडा पडला आहे. मागील वर्षापासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्टचे (Anil Parab Sai Resort) बांधकाम हे अनधिकृत असल्याचा दावा केला होता. मात्र आता त्यावर थेट अॅक्शन घेण्यात आली आणि साई रिसॉर्ट (Anil Parab Sai Resort) पाडण्यात आलं आहे.
सदानंद कदम आणि अनिल परब यांच्याविरोधामध्ये दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा 14 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. रिसॉर्ट बांधत असताना 200 मीटर आत बांधण्यात आले, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. (Anil Parab Sai Resort)
अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टचं प्रकरण किरीट सोमय्यांनी लावून धरलं. त्यानंतर बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून गुन्हेगारीचा आरोप करण्यात आला. याचपार्श्वभूमीवर रिसॉर्टचे काम तोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. याबाबत सोमय्या यांनी ट्वीट केलं आहे.
किरीट सोमय्या ट्वीट
“अनिल परब यांचं दापोली साई रिसॉर्टवर हातोडा तोडकाम सुरू…. साई रिसॉर्ट अनधिकृत बांधकाम विरोधात अनिल परब आणि सदानंद कदम यांच्यावर फौजदारी कारवाई प्रक्रिया ही सुरू आहे. सध्या दोघे जामीनावर बाहेर आहेत. हिसाब तो देना पड़ेगा”, असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
अनिल परब चा दापोली साई रिसॉर्ट वर हातोडा
तोडकाम सुरू….साई रिसॉर्ट अनधिकृत बांधकाम विरोधात अनिल परब आणि सदानंद कदम वर फौजदारी कारवाई प्रक्रिया ही सुरू आहे सध्या दोघे जामीनावर आहे
हिसाब तो देना पड़ेगा@BJP4India @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/uzbnrcfTC4
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) April 3, 2024
सोमवारी किरीट सोमय्या हे रत्नागिरीत गेले होते. त्यावेळी रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा विषय मांडला होता. सीआरझेड कायदा उल्लंघनाची कारवाई करण्याची मागणी सोमय्यांनी केली. यावेळी सोमय्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षांची भेट घेतलीये.
माध्यमांशी बोलत असताना सोमय्या म्हणाले की, “कोणावरही सरसकट कारवाई होणार नाही पण ज्यांचं अनधिकृत बांधकाम आहे. त्यांच्यावर कारवाई होईल” असं सोमय्या म्हणाले.
News Title – Anil Parab Sai Resort On Action By BJP Leader Kirit Somaiya
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल हंगामात 21 वर्षीय मयंक यादवची हवा, अवघ्या 2 सामन्यात लावले सर्वांना वेड
OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतोय तब्बल 6 हजारांचा डिस्काउंट; जाणून घ्या डिटेल्स
आकर्षक फीचर्ससह बजाज कंपनीची Pulsar N250 बाईक लाँच; किंमत किती असणार?
मोठी गुड न्यूज! सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त
पुण्यात गुन्हेगारांचे धाबे दणाणले, पोलीस कोम्बिंग ऑपरेशन करणार!