बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझेंनी केलेल्या आरोपांवर अनिल परब म्हणाले, ‘बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो…’

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले पत्र लिहिल्यानंतर आता राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी देखिल महाराष्ट्रातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केल्याचं एक पत्र लिहिलं आहे.

सचिन वाझे याने अनिल परब यांचं नाव घेतल्यानंतर स्वतः परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचं खंडन केलं आहे. या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी म्हटलं आहे की, ‘मी माझ्या दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो की माझ्यावरील सर्व आरोप खोटे असून मला बदनाम करण्याचा हा कट आहे.’

त्याबरोबरच भाजप मागच्या दोन-तीन दिवसांपासून आणखी एका मंत्र्याचा बळी घेऊ म्हणत होतं म्हणजे त्यांना वाझे हे पत्र लिहिणार आणि त्यात असा उल्लेख करणार हे त्यांना आधीच माहिती होतं, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे. तसेच एक आरोप माझ्यावर आणि दुसरा अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून घोडावत यांच्यावर करण्यात आल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.

सचिन वाझेने माझ्यावर जे आरोप केले आहेत त्याचा माझा काहीही संबंध नाही आणि तशी कोणती चौकशी सुरू आहे याच्याबद्दल मला काही कल्पनाही नाही असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं. तसेच आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत असंही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करण्याची भाजपची ही रणनीती असल्याचं आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी व्यक्त केलं.

थोडक्यात बातम्या

लवकरच देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवार यांची भेट!

नागरिकांनो कुटुंबाची काळजी घ्या!; दिल्लीतील डॅाक्टरांचं कोरोनाबद्दल धक्कादायक निरीक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानात काय सांगितलं?; साऱ्या देशाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर उघड

सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब; अनिल देशमुखांसह महाविकास आघाडीतील 3 मंत्र्यांवर केला गंभीर आरोप

‘शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितले’; सचिन वाझेंचा मोठा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More