महाराष्ट्र मुंबई

‘आत्मनिर्भर’च्या नावाखाली भाजपकडून कोकणवासियांची दिशाभूल- अनिल परब

मुंबई | आत्मनिर्भरच्या नावाखाली भाजपवाले कोकणवासियांची दिशाभूल करत आहेत. कोकणवासियांना नुकसान भरपाईसाठी भरभरुन मदत दिली गेली. मात्र भाजप नेत्यांकडून नागरिकांना खोटी माहिती दिली गेली, अशी टीका रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी केली.

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी झूम अ‍ॅपद्वारे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली.

निसर्ग चक्रीवादळानंतर नुकसानग्रस्तांना तातडीने मदत पोहोचली नाही, अशी खोटी माहिती भाजपकडून दिली जात आहे. राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यासाठी 116 कोटी रुपयांची मदत दिली आहे. यापैकी 54 कोटींचे वाटप झाले तर 62 कोटींचे वाटप सुरु आहे. अशीच मदत रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनादेखील मिळाली आहे, असं अनिल परब म्हणाले.

निसर्ग चक्रीवादळानंतर नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी एनडीआरएफच्या निकषात बदल करण्याचे धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं, असंदेखील अनिल परब म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

पंकजा मुंडे यांना केंद्रात ‘हे’ पद मिळण्याची शक्यता!

कोरोनाचा फास आवळला! भारत ‘या’ देशाला मागे टाकत पोहोचणार तिसऱ्या स्थानावर…

महत्वाच्या बातम्या-

वाट्टेल ती किंमत मोजून ठाकरे सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्यात, पण …- संजय राऊत

कोरोना संशयित रूग्णाचा मृतदेह तब्बल ३ तास एसटी आगारात पडला, लाजीरवाणं कृत्य…

BSNL चा नवा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन; दररोज मिळणार 5 जीबी डेटा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या