महाराष्ट्र मुंबई

“धनंजय मुंडेंवर आरोप झाले, मग त्यांना लगेच फासावर चढवायचं का?”

मुंबई | धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले आहेत. मग काय त्यांना लगेच फासावर चढवायचं का?, असं परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची कायद्यानुसार चौकशी होईल. त्यानंतर कादेशीर निर्णय घेतला जाईल, असं अनिल परब म्हणाले.

कोणी कोणावर आरोप केले म्हणजे तातडीची कारवाई होत नाही. विरोधकांचं कामच आरोप करणं हे आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केले आहेत; त्याची चौकशी होईल. या सर्व गोष्टीसाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याप्रमाणेच सर्व गोष्टी होतील, असं परब म्हणाले.

तक्रार करणं किरीट सोमय्या यांचा धंदा आहे. त्यांनी तक्रार केली म्हणून कारवाई करायची हा एकाप्रकारे कुणावर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे कुणी काही म्हणू देत, सत्य बाहेर येऊ देत. त्यांनतरच काय तो निर्णय होईल, असं परब म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

आज त्यांनी मुंडेंना टार्गेट केलं, काही वर्षांपूर्वी त्या जागी मी असू शकलो असतो- कृष्णा हेगडे

धनंजय मुंडेंनी राजीनाम्यावर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर तुम्ही तक्रार का देताय?, हेगडे म्हणाले…

“धनंजय मुंडेंवर माझा विश्वास ते स्वत:च राजीनामा देतील”

“माहिती लपविणं हा गुन्हा, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या