महाराष्ट्र मुंबई

“देवासारख्या नेतृत्वावर कोण टीका करत असेल तर सहन करणार नाही”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कार्टून काढल्या प्रकरणी शिवसैनिकांनी माजी सैन्य अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अधिकाऱ्याने मर्यादा सोडली तर कार्यकर्त्यांनीही मर्यादा सोडली अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या मारहाणीचं समर्थन केलं आहे. ते  एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते.

देवासारख्या नेतृत्वावर कोण टीका करत असेल तर सहन करणार नाही, रागाने मारले तर का मारलं ते बघा, अधिकाऱ्याने आपल्या मर्यादेत राहायला हवं, असं अनिल परब म्हणालेत.

आमच्या नेतृत्वाचा अपमान करायचा मग त्यावर कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त केला ती गुंडगिरी कशी? कारण नसताना खंडणीसाठी मारहाण केलीय का? त्याने जे कार्टून फॉरवर्ड केले त्यावर कार्यकर्त्याचा संताप होता, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मनोरंजन करण्यासाठी रियाचं आयुष्य पणाला लावू नका”

लोकसभेच्या 17 खासदारांना कोरोनाची लागण

मदन शर्मा मारहाण प्रकरणी नवनीत राणांनी घेतली राजनाथ सिंग यांची भेट!

विरोधकांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाही- रोहित पवार

“शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची सीबीआय चौकशी नाही, बदनामीसाठी काहींनी कंगणाच्या मुद्द्याचं पिल्लू सोडलं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या