बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील- अनिल परब

मुंबई | सचिन वाझेंनीही एक लेटरबॉम्ब टाकला आहे. वाझे यांनी या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील 3 मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांनी NIA कोर्टात हे पत्र दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रात शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा उल्लेख असल्याचे समोर आलं आहे. मात्र अनिल परब यांनी वाझेंनी केलेले सर्व फेटाळले आहेत.

मला चौकशीला बोलवा, मी तयार आहे. जर मी दोषी असेल तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील, मी पूर्णपणे कायदेशीर लढणार मी लढाईच्या तयारीत आहे. अश्या धमक्यांना मी घाबरत नाही, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत वाझेंनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे.

माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आणि माझ्या दोन्ही मुलींची शपथ घेऊन मी सांगतो की हे खोट आहे. मला बदनाम करण्यासाठी केलेले आरोप आहेत, असं अनिल परब म्हणाले.

भाजपचे पदाधिकारी आम्ही तिसरा बळी घेऊ म्हणत होते. त्यामुळे भाजप ने हे बनवलेला प्रकरण आहे. वाझे हे पत्र देणार आहे हे भाजपला आधीपासून माहीत होतं म्हणून ते गाजावाजा करत आहे, पण त्यांनी राजीनामा मागितला तर आम्ही राजीनामा देणार नाही, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकारला सुनावलं, म्हणाले…

गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांचं निधन

महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान थांबेना; आज दिवसभरातील आकडेवारी चिंताजनक

11 एप्रिलपासून तुमच्या कार्यालयातच कोरोना लस मिळणार, केंद्राकडून राज्यांना तयारीचे आदेश

‘ही’ 3 लक्षणं असतील तर सावध व्हा; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची लक्षणं आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More