महाराष्ट्र मुंबई

तासाभरात 1 महिन्याचा, तर दिवाळीपूर्वी 2 महिन्यांचा पगार आणि बोनस जमा करणार- अनिल परब

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचा पगार देण्यात येणार असून, तासाभरात या महिन्याचा पगार जमा होणार असल्याचीही माहिती अनिल परबांनी दिली आहे.

दिवाळीपूर्वी अजून एक महिन्याचे वेतन असे एकूण थकीत दोन महिन्यांचे वेतन दिलं जाणार आहे. हे तात्पुरते संकट आहे, एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नका, ही नम्र विनंती, असं आवाहनही अनिल परब यांनी केलंय.

दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्याबाबत अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे. आजच एका तासात एक पगार आणि सणाची अग्रिम रक्कम देण्यात येईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिलीये.

कृपया आत्महत्या करू नका, तुमच्या आत्महत्येनंतर कुटुंबावर ओढावणारं संकट फार मोठं असेल. सध्याचं संकट तात्पुरतं आहे. यावर लवकरच मार्ग काढू, पण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासन अनिल परब यांनी दिलंय.

महत्वाच्या बातम्या-

“उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटीच नाही, तर मराठी सिनेमेही बनवणार”

“राज्यपालांनी अर्णब गोस्वामींची चिंता करु नये, सरकार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतय”

‘त्या’ वक्तव्यावरून एकनाथ खडसेंनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी!

‘माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार’; सुसाईड नोट लिहीत एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

“आम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकलो नाही ही खरंच शरमेची गोष्ट”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या