महाराष्ट्र मुंबई

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी घेतला हा महत्वाचा निर्णय

मुंबई | दिवाळी सणानिमित्त एसटी बसची वाढती मागणी लक्षात घेऊन, एसटी महामंडळाने 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे 1 हजार विशेष जादा फेऱ्यांचं नियोजन केलं आहे.

प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन, दिवाळी सणानिमित्त होणारी जादा वाहतूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी, आवश्यक त्या सूचना महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत स्थानिक आगाराला देण्यात आलेल्या आहेत.

या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकावरून सुटणार असुन, त्या टप्प्याटप्प्याने आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.

आगाऊ आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. असं देखील आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“शिवसेनेचा भगवा फडकेल पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील” 

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण 

‘ठाकरे सरकार आणि बीएमसीनं केला 900 कोटींचा जमीन घोटाळा’; भाजप नेत्याचा गंभीर आरोप 

सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षण सुनावणीवर शरद पवार म्हणाले…

“शरद पवारांनी मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका मांडावी, मग आम्ही…”

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या