बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…मग मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो का?’; अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई | राज्याच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा बोजा अव्याहतपणे वाहणारी लालपरी (ST) सध्या आगारामध्ये धुळखात उभी होती. अशातच काही एसटी कर्मचारी (ST Employee) आपल्या महामंडळ विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीवर ठाम आहेत. विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा विचार सध्या ठाकरे सरकार करत आहे.

एसटी कर्मचारी पगारवाढीच्या घोषणेनंतरही कामावर रूजू होण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत सरकार म्हणून आम्ही आवश्यक ती कारवाई करण्याचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी दिली आहे. इतकंच नाहीतर संप 60 दिवस चालला तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो, अशी अफवा पसरली आहे, असंही परब म्हणाले आहेत.

संप 60 दिवस चालला तरीही मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागत नाही. अशी अफवा पसरवून कोणीतरी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनिल परब यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर हजर राहण्याची विनंती केली आहे. राज्य सरकारची विलीनीकरणाबाबत स्पष्ट भूमिका आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरच विलीनीकरणाचा मुद्दा निकाली निघणार आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं 41 टक्के पगारवाढ दिली आहे. संप मागं घेतला नाहीतर पगारवाढ मागं घेतली जाणार आहे. याबाबत सर्वत्र चर्चा होत होत्या. पण पगारवाढीचे स्पष्ट आदेश निघाले आहेत. परिणामी पगारवाढ मागं घेण्याचा निर्णय होणार नाही, असं परब यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या 

लवकर वसतिगृहे चालू करा! स्टुडंट हेलपिंग हँड व छात्रभारतीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कंगनाला शेवटी माफी मागावीच लागली, शेतकऱ्यांनी अडवली गाडी अन्…; पाहा व्हिडीओ

देवेंद्र फडणवीसांना वाटते ‘या’ गोष्टीची भीती, स्वत:च केला खुलासा

विराट कोहली Out की Not Out?, अंपायरच्या निर्णयानंतर वाद पेटला; पाहा व्हिडीओ

बिबट्या थेट वर्गात शिरला अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More