बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी कर्मचाऱ्यांना अनिल परब यांचं महत्त्वाचं आवाहन, म्हणाले…

मुंबई | गेल्या चार महिन्यांपासून एसटी संपाचा तिढा सुटायचं नाव घेईना. विलीणीकरणाच्या मागणीवरुन एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपासून सपं पुकारला आहे. यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला. अद्यापही एसटी कर्मचारी आंदोलनाच्या निर्णयावर ठाम असल्याचं पहाला मिळत आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी काल मुख्य सचिवांच्या समितीने फेटाळली. न्यायालयाने नियुक्त केलेल्या या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधानसभेत मांडला.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांना इशाराही दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 10 मार्चच्या आत कामावर रुजू व्हावं. पुन्हा एकदा कामावर यावे आणि आपली सेवा सुरू करावी, असं अनिल परब यांनी म्हटलं.

दरम्यान, काही कर्मचाऱ्यांनी संप मोडून सेवेत रूजू झाले आहेत. मात्र काही कर्मचारी अजूनही विलीनीकरणावर ठाम आहे आणि संप करत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

‘माझा प्रवास तुमच्याशिवाय शक्य नव्हता’; 100 व्या टेस्टवेळी विराट भावूक

मोठी बातमी! ठाकरे सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दणका

राज ठाकरेंच्या दमदार आवाजातील ‘हर हर महादेव’चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडीओ

सिद्धार्थ शुक्लाच्या सोशल मीडिया अकांऊटमध्ये मोठा बदल, चाहतेही भावूक

‘आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाहीत’; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More