शिरोळे म्हणतात, माझ्यापेक्षा जास्त मताधिक्याने बापटांना निवडून आणणार…

पुणे |  गेल्यावेळेपेक्षा जास्त मताधिक्याने बापटांना निवडून आणणार, असं म्हणत अनिल शिरोळे यांनी बापटांच्या उमेदवारील समर्थन दिलंय.

पक्षाने तिकीट कापल्यामुळे शिरोळे आणि कार्यकर्त्या मध्ये नाराजीचं वातावरण असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र पक्षाच्या या निर्णयाबाबत शिरोळें म्हणाले की भारतीय जनता पक्षाने आजवर मला खूप दिले आहे. लोकसभेत काम करण्याची संधी दिली, चारवेळा नगरसेवकपद, दोन वेळा पक्षाचे शहराध्यक्षपद दिले.

एकवेळा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी दिली याबाबत मी पक्षाचा कृतज्ञ असून उमेदवारी न दिल्याने मी नाराज नाही. असं मत शिरोळे यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान , नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. यासाठी मी बापटांसाठी जोमाने काम करेन असं शिरोळे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

महादेव जानकरांनी केलेत निवडणुकीच्या तोंडावर गौप्यस्फोट!

नाराज झालेले जानकर म्हणतात, पक्षातले लोक सोडून गेले तरी रासप पक्ष वाढत राहील

माढ्यातून सुभाष देशमुखांच्या मुलाचं नाव आघाडीवर; रणजितसिंह मोहितेंच्या भूमिकेकडे लक्ष

धुळ्यात शिवसैनिक म्हणतात, मोदी तुमच्याशी वैर नाही पण डॉ. भामरे तुमची खैर नाही!

पुण्यात अनिल शिरोळेंना डच्चू तर गिरीश बापटांना लागली लॉटरी!